Rain : पावसाचे २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत; ‘आयआयटीएम’चा निष्कर्ष; मॉन्सूनच्या अंदाजात होणार अधिक अचूकता

आकाशातून कोसळणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीपर्यंत पोहोचतोच असे नाही. तर....
rain

rain

sakal

Updated on

पुणे - आकाशातून कोसळणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीपर्यंत पोहोचतोच असे नाही. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात विशेषतः पुणे परिसरात ढगातून जमिनीकडे येताना पावसाच्या थेंबांपैकी सरासरी २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत होतात, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (आयआयटीएम), पुणेच्या संशोधनातून समोर आला आहे. पावसाच्या या बाष्पीभवनामुळे प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत असून, मॉन्सूनच्या अंदाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com