सी-मेटकडून नवे २४ तंत्रज्ञान बाजारात

स्वदेशी उद्योगांना आवश्यक २४ इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अर्थात सी-मेटने बाजारात दाखल केले आहेत.
Dr. B. B. Kale
Dr. B. B. KaleSakal
Summary

स्वदेशी उद्योगांना आवश्यक २४ इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अर्थात सी-मेटने बाजारात दाखल केले आहेत.

पुणे - स्वदेशी उद्योगांना (Indian Business) आवश्यक २४ इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अर्थात सी-मेटने (C-Met) बाजारात दाखल केले आहेत. सी-मेटच्या पुणे, हैदराबाद, त्रिचूर येथील प्रयोगशाळांनी पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) येथे हे तंत्रज्ञान नुकतेच सादर केले आहे.

उद्योगांसोबतच्या या परिसंवादाला सी-मेटचे महासंचालक डॉ. बी. बी. काळे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील ईएमसीडीचे संचालक डॉ. संदीप चॅटर्जी, सी-मेट त्रिचूरचे संचालक डॉ. एन. राघू, सी-मेट हैदराबादचे संचालक डॉ. आर. रथीश, एमसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत गाडगीळ आदी उपस्थित होते. सेमिकंडक्टर पदार्थांपासून ते ग्राफीन आणि क्वांटम मटेरीअल्सपर्यंत विविध तंत्रज्ञानांवर सी-मेट कार्य करत आहे. डॉ. काळे यांनी उद्योगांसमोर सी-मेटमध्ये चालू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. तसेच उद्योगांना आवश्यक बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक पदार्थ, पॅकेजिंग, नॅनो मटेरीअल्सवर सी-मेटमध्ये चाललेले काम आणि उद्योगांचे सहकार्य या विषयी डॉ. काळे बीजभाषण दिले. उद्योगांनी आवश्यक तंत्रज्ञानासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी कटिबद्धता दर्शवली. एमसीसीआयचे सहसंचालक प्रशांत जोगळेकर यांनी आभार मानले.

इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला ५० कोटी

भोसरी आणि पिंपरी चिंचवड येथील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्या क्लस्टरसाठी ५० कोटी रुपये एमसीसीआयकडे सुपूर्त करण्यात येतील, अशी माहिती डॉ. चॅटर्जी यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहितीतंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने पुण्यात बॅटरी, ॲडेटीव्ह मॅनिफॅक्चरींग, इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजिंग आदी क्षेत्रांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. एमसीसीआयएच्या भोसरी आणि पीसीएमसी फॅसिलीटीमध्ये उत्पादनांचे सिम्युलेशन, योग्य मापन आणि अचूक चाचणीसाठीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com