मंचर - उत्तराखंड राज्यातील गंगोत्री येथे गेलेले अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील २४ यात्रेकरू मंगळवार (ता. ५) पासून संपर्काबाहेर गेले होते. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, गुरुवारी (ता. ७) सकाळी यात्रेकरूंमधील मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यांनी सर्व भाविक सुखरूप असल्याचे सांगितले आहे.