Pune Road Potholes : २४ हजार दुचाकींनी केली ९३ लाख हादऱ्यांची नोंद; महापालिकेकडून केला जाणार अभ्यास

खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे होणारे हाल, नागरिकांच्या तक्रारी आणि वारंवार होणारी रस्त्यांची दुरवस्था यावर अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही.
pune road Potholes
pune road Potholesesakal
Updated on: 

पुणे - पुण्यातील रस्त्यांवरून दुचाकी चालवताना खड्डा चुकविण्यासाठी अचानक ब्रेक दाबणे, खड्ड्यातून गाडी गेल्यानंतर बसणारा जोराचा हादरा, गतीरोधक, असमान पातळीतील रस्ते यामुळे पुणेकरांना प्रचंड त्रास होतो. यासाठी शहरातील खड्डे शोधण्यासाठी महापालिकेने एथर कंपनीच्या शहरातील २४ हजारांहून अधिक कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकींमधून रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. त्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल ९३ लाख हादरे दुचाकीस्वारांना बसल्याचे समोर आले आहे. आता हे हादरे नेमके खड्ड्यांमुळे बसले आहेत की अन्य कोणते कारण आहे याचा शोध महापालिका घेत आहे.

Loading content, please wait...