म्युकरमायकोसीसवर पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांची मात

गेल्या दोन महिन्यात पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांनी म्युकरमायकोसीस या गंभीर आजारावर मात केली आहे. हे सर्व रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत.
म्युकरमायकोसीसवर पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांची मात

पुणे - गेल्या दोन महिन्यात पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांनी म्युकरमायकोसीस (Mucormycosis Patient) या गंभीर आजारावर (Sickness) मात केली आहे. हे सर्व रुग्ण उपचारानंतर (Treatment) पूर्ण बरे (Recover) झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसचे ९६८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सध्या ६३६ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. अन्य ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (242 Mucormycosis Patients Recover in Pune District)

जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळल्यास सुरवात झाली होती. पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये ३५५, मे महिन्यात ४२१ तर जून महिन्यात आजअखेरपर्यंत (ता.१२) १९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अकरा रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

म्युकरमायकोसीसवर पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांची मात
पुण्यात विकेंडला हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद; फक्त पार्सल सेवा सुरू

म्युकरमायकोसीसच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे महापालिका हद्दीतील सर्वाधिक ४०६ जण आहेत. यापैकी ९७ बरे झाले असून २८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अन्य २९ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत २२७ रुग्ण आढळून आले असून यापैकी ९३ उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. सध्या ११० रुग्णावर उपचार सुरु आहेत. अन्य २४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ जण बरे झाले आहेत. सध्या २१ जणांवर उपचार सुरू असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय जिल्ह्याच्या सर्व भागातील (नगरपालिका, कॅंटोन्मेंटसह) ससून रुग्णालयात म्युकरमायकोसीसच्या २९० रुग्णांची नोंद झाली आहे. ससूनमधील ३७ रुग्ण बरे झाले असून सध्या २२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ससूनमध्ये आतापर्यंत २८ रुग्णांचा म्युकरमायकोसीसमुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com