पुणे जिल्ह्यात आज २४८१ नवे कोरोना रुग्ण; आज टेस्ट निम्म्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

रविवारच्या तुलनेत आज कोरोना चाचण्या निम्म्याच घेण्यात आल्याने, नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार १०० रुग्णांचा समावेश आहे. 

पुणे - पुणे जिल्ह्यात सोमवारी  (ता.१४) दिवसभरात २ हजार ४८१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारच्या (काल) तुलनेत आज कोरोना चाचण्या निम्म्याच घेण्यात आल्याने, नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार १०० रुग्णांचा समावेश आहे. 

रविवारी १४ हजार ५८७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४ हजार १३४ कोरोनाबाधित आढळून आले होते. मात्र आज (ता. १४) केवळ ७ हजार ५४२ म्हणजेच कालच्या तुलनेत निम्म्याच  चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच  पिंपरी चिंचवडमधील ७६०,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४६०, नगरपालिका क्षेत्रातील १३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील २६ रुग्णांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दिवसभरात ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३९ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येकी १६, नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १३) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १४) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आज दिवसभरात २ हजार ९२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ४५६, पिंपरी चिंचवडमधील ४५९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६०४, नगरपालिका क्षेत्रातील ३१८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ८५ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८१ हजार ३१५ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील  १८२ जण आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2481 new corona patients in Pune district today