Archana Tambe
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत पाच हजार २१७ खातेदारांच्या एक हजार १०७ हेक्टर क्षेत्रावरील, तर जुन्नर तालुक्यात १२ हजार ९७ खातेदारांच्या आठ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २५ टक्के पंचनामाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरितही काम गतिमान पद्धतीने सुरू आहे.' अशी माहिती आंबेगाव जुन्नर विभागाच्या प्रांत अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली.