Shyam Rokade
sakal
मंचर - भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (ता. ५) मृत्यू झाला. श्याम रोकडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच श्याम यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.