esakal | पुणे जिल्ह्यात अडीच हजार दिव्यांगांचे झाले कोरोना लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पुणे जिल्ह्यात अडीच हजार दिव्यांगांचे झाले कोरोना लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्यावतीने (Pune ZP) सोमवारी (ता. १४) दिव्यांगांसाठी (Cripples) राबविण्यात आलेल्या खास मोहिमेत (Campaign) २ हजार ४०२ दिव्यांगांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात यश (Success) आले आहे. या मोहिमेत १ हजार ५२५ दिव्यांगांना कोरोना लसीचा पहिला डोस, तर ८७७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. (2500 Cripples were Vaccinated against Corona in Pune District)

कोवीन ॲपवर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींची नोंदणी बंद आहे. त्यामुळे या खास मोहिमेत जिल्ह्यातील या वयोगटातील दिव्यांगांचे लसीकरण करता येऊ शकले नाही. आजच्या मोहिमेत केवळ ४५ वर्षांपुढील दिव्यांगांनाच कोरोना लसीचा लाभ घेता आला आहे. जिल्ह्यातील १८८ लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना लस देण्याची सोय केली होती. दिव्यांगांच्या लसीकरणास अडथळे येऊ नयेत, यासाठी आज सामान्य नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनामुळे 33 हजार मुले मूळ शाळेला मुकणार

पुणे जिल्ह्यात एकूण २८ हजार ७७२ दिव्यांग आहेत. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांगांचे प्रमाण अधिक आहे. आज लसीकरणात ६० वर्षांपुढील २४२ जणांना आणि ४५ वर्षांपुढील १ हजार २८३ जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ४५ वर्षांपुढील ४२२ आणि ६० वर्षांपुढील ४५५ दिव्यांगांना दुसरा डोस दिला आहे.

बारामती तालुक्यातील सर्वाधिक ३३५ दिव्यांगांनी तर, सर्वात कमी भोर तालुक्यातील ४८ दिव्यांगांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. अन्य तालुक्यातील तालुकानिहाय लसीकरण पुढीलप्रमाणे ः- आंबेगाव - २३८, दौंड -१९३, हवेली -१९६, इंदापूर -१९५, जुन्नर -२६७, खेड -२३२, मावळ -१४१, मुळशी -१०८, पुरंदर -१२२, शिरूर -२७४ आणि वेल्हे - ५३.

loading image
go to top