Baramati Yoga Camp: जागतिक योगादिनाचे औचित्य साधून बारामती येथे योगशिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये २५०० महिलांनी सहभाग घेतला असून काही पुरुषांचाही यात सहभाग होता.
बारामती : जागतिक योगादिनाचे औचित्य साधून बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क येथे आयोजित योग शिबीरात एकाच वेळेस अडीच हजार महिलांनी सहभाग घेतला. एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने योगासन करण्याचा औदयोगिक क्षेत्रातील बारामतीतील हा पहिलाच प्रयोग होता.