‘पर्वतीतील २६ कुटुंबे पुनर्वसनास अपात्रच’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये पर्वती येथील सर्व्हे नंबर १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांना पुराचा फटका बसला होता. परंतु ही कुटुंबे प्रकल्पग्रस्त नाहीत, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करता येणार नाही, असे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.

पुणे - आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये पर्वती येथील सर्व्हे नंबर १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांना पुराचा फटका बसला होता. परंतु ही कुटुंबे प्रकल्पग्रस्त नाहीत, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करता येणार नाही, असे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाच महिन्यांपूर्वी पुण्यात अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्याचा फटका हजारो नागरिकांना बसला. पर्वती येथील सर्व्हे नंबर १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथे पुरामध्ये २६ कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले होते. त्यावर जी कुटुंबे पुरामध्ये बाधित झाली आहेत, त्यांचे आठवड्यात जवळच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करावे. महापालिकेच्या गाळा वाटप नियमावलीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच सरकारची मान्यता मिळेल, या भरवशावर आठवड्यात पुनर्वसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण समितीने केला होता. त्या ठरावावर आयुक्तांनी शहर सुधारणा, स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये पुरामध्ये बाधित कुटुंबे प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येणार नाही, असे या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 families in the mountains are ineligible for rehabilitation

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: