पुणे ग्रामीण पोलिस दलातील या 26 जणांचा उद्या सन्मान

जनार्दन दांडगे
Friday, 14 August 2020

स्वातंत्र्यदिनाच्या प्रार्श्वभूमीवर पोलिस दलात उल्लेखनिय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा ग्रामिण पोलिस दलातील अठरा पोलिस अधिकारी व आठ पोलिस कर्मचारी, अशा 26 जणांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) करण्यात येणार आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : स्वातंत्र्यदिनाच्या प्रार्श्वभूमीवर पोलिस दलात उल्लेखनिय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा ग्रामिण पोलिस दलातील अठरा पोलिस अधिकारी व आठ पोलिस कर्मचारी, अशा 26 जणांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) करण्यात येणार आहे. 

पोलिस दलात दरवर्षी उल्लेखनिय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आंतरिक सुरक्षा पदक व पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन दरवर्षी महाराष्ट्र दिनी सन्मान केला जातो. मात्र, चालू वर्षी कोरोनामुळे महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे वरील सन्मान स्वंतत्र दिनाच्या प्रार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) करण्यात येणार आहे. 

आंतरिक सुरक्षा पदक विजेते पोलिस अधिकारी पुढीलप्रमाणे : अण्णासाहेब मारुती जाधव (उपविभागीय पोलिस अधिकारी भोर), दीपाली मोहन खन्ना (उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर) गणेश रंगनाथ उगले ( पोलिस निरीक्षक लोणी काळभोर), यशवंत नलावडे (पोलिस निरीक्षक सुरक्षा शाखा), नितीन मोहन मोहिते (पोलिस उपनिरीक्षक दौंड), अमोल महादेव गोरे (पोलिस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा), रामेश्वर चंद्रभान धोंगडे (पोलिस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा), नितीन शिवाजी लकडे (पोलिस उपनिरीक्षक यवत पोलिस ठाणे), भगवान जगन्नाथ पालवे (पोलिस उपनिरीक्षक शिरूर पोलिस ठाणे), शिवाजी लक्ष्मण ननावरे (पोलिस उपनिरीक्षक लोणी काळभोर पोलिस ठाणे), राजेंद्र भीमा पवार (पोलिस उपनिरीक्षक भोर पोलिस ठाणे), अनिल मनोहर लवटे (पोलिस उपनिरीक्षक पौड पोलिस ठाणे), मृगदीप सुधाकर गायकवाड (पोलिस उपनिरीक्षक लोणावळा शहर पोलिस ठाणे), सुशील श्यामराव लोंढे (पोलिस उपनिरीक्षक इंदापूर पोलिस ठाणे). 

पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी : रमेश नारायण खुणे (सहायक पोलिस निरीक्षक- वाचक पोलिस अधिक्षक कार्यालय), दत्तात्रेय महादेव दराडे (सहायक पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे), अर्जुन हरिबा मोहिते (सहायक पोलिस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक), जितेंद्र दत्तात्रेय शेवाळे (सहायक फौजदार दहशतवाद विरोधी पथक), राजू बापूराव पुणेकर (पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग), रवींद्र एकनाथ शिनगारे (पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग), सचिन मोहन गायकवाड (पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग), नीलेश बाळासाहेब कदम (पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग), सुरेश दौलत भोई (पोलिस हवालदार सासवड पोलिस ठाणे), अजित रघुनाथ ननवरे (पोलिस हवालदार लोणावळा ग्रामिण पोलिस), प्रमोद परशुराम नवले (चालक, पोलिस नाईक स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग) व मंगेश तुकाराम नेवसे (पोलिस नाईक सायबर पोलिस ठाणे).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 members of Pune Rural Police will be honored tomorrow