coronavirus
coronavirus

पुणे जिल्ह्यात गुरुवारी 2656 नवे रुग्ण;3768 रुग्ण कोरोनामुक्त

Published on

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 2 हजार 656 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 36 जणांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात 3 हजार 768 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 633, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 744, नगरपालिका क्षेत्रात 177 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 66 नवे रुग्ण सापडले आहेत.दरम्यान काल 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक 42 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 5, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 15, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.30 सप्टेंबर) रात्री 9 वाजल्यापासून काल (ता.1 ऑक्‍टोबर) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

काल कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 170, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 236, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 136, नगरपालिका क्षेत्रातील 203 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 23 जण आहेत. काल अखेरपर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 598 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यातील काल अखेरपर्यंतची कोरोना स्थिती

कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 11 लाख 81 हजार 606
एकूण कोरोना रुग्ण 2 लाख 86 हजार 777
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण 2 लाख 42 हजार 180
कोरोनामुळे झालेले मृत्यू 6 हजार 598
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 21 हजार 700
घरातच उपचार घेणारे कोरोना रुग्ण 16 हजार 348

एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 677, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 323, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 49, नगरपालिका क्षेत्रातील 372 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 177 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 251 रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com