Pandharpur Wari: २७ वर्षाची परंपरा असलेल्या थापलिंग पायी दिंडी सोहळ्यात तरुणांचा उस्फूर्त सहभाग

Thapaling Dindi Reaches Pandharpur: आंबेगाव तालुक्यातील वळती येथून निघालेला २७ वर्षांची परंपरा असलेला थापलिंग पायी दिंडी सोहळा पंढरपुरात दाखल झाला.
Pandharpur Wari

Pandharpur Wari

esakal

Updated on

निरगुडसर: गेल्या २७ वर्षाची परंपरा असलेल्या थापलिंग पायी दिंडी सोहळा आज पंढरपूरला पोहचला,या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंडी सोहळ्यात तरुणांचा उस्फूर्त सहभाग आहे.वळती (ता.आंबेगाव) येथील थापलिंग पायी दिंडी सोहळा कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने आणि विश्वनाथ महाराज रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले २७ वर्षापासून सुरू आहे.श्रीक्षेत्र थापलिंग गडावरून दिंडी सोहळा वळती गावात आल्यानंतर येथून ११ जुलै २०२६ रोजी एकादशी या दिवशी मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com