हवेलीच्या पश्चिम पट्ट्यात कोरोनाचा आकडा वाढला, एकूण रुग्ण संख्या किती झाली पाहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

हवेलीमध्ये आज दिवसअखेर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५५५ पर्यंत पोचली आहे.

खडकवासला (पुणे) : हवेलीमध्ये आज दिवसअखेर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५५५ पर्यंत पोचली आहे. तालुक्यात आज सोमवारी कोरोनाचे नवीन २८ रुग्ण सापडले. त्यातील १७ रुग्ण तालुक्याच्या पश्चिम भागातील आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनानाने पूर्व भागात आज एकाचा मुत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. आज पूर्व भागापेक्षा पश्चिम भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. नांदेड येथे 6, खडकवासलयामध्ये 4, कोंढवे धावडे येथे 3, खानापूर येथे 2, नऱ्हे, किरकटवाडी येथे प्रत्येकी एक-एक रुग्ण सापडला आहे. या भागात अधिक रुग्ण सापडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व भागात उरुळी कांचन येथे 5 रुग्ण सापडले आहेत. हांडेवाडी येथे 2, मांजरी बुद्रुक, तुळापूर, पिंपरी सांडस, बकोरी येथे प्रत्येकी एक-एक सापडला आहे. अशा प्रकारे दिवसभरात तालुक्यात नवीन २८ रुग्ण वाढले. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५५५ वर गेली आहे. सध्या २७७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर २७० रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत, असे खरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 new corona patients in haveli on monday