पुण्यात 28 टक्‍के रुग्ण शहराबाहेरील; अन्य जिल्ह्यासाठीही पायाभूत सुविधा उभारणार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

पुणे जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऑक्‍सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी एक ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे राव यांनी सांगितले. 

पुणे - शहरात सुमारे 28 टक्‍के कोरोनाबाधित रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे येथील रुग्णालयांवरील ताण पाहता पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील रुग्णही उपचार घेत आहेत. या रुग्णसंख्येत आणखी वाढ होणार आहे. ही परिस्थिती पाहता सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऑक्‍सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी एक ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे राव यांनी सांगितले. 

घरी उपचार घेणाऱ्यांना विम्याचा लाभ नाही 
गंभीर लक्षणे नसलेल्या परंतु घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात येत नाही. तसेच, रुग्णालयात दाखल असतील तरीही या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रुग्णांना महापालिकेच्या हेल्पलाइनमार्फत मदत उपलब्ध करून दिली जाते. तसेच, त्यांना खासगी रुग्णालयात पैसे देऊन उपचार घेणे हा पर्याय आहे. मात्र, या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ससूनमध्ये 23 सप्टेंबरपर्यंत नवीन रुग्ण नाही 
ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीमध्ये ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी 23 सप्टेंबरपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करण्यात येणार नाही. त्याऐवजी जम्बो हॉस्पिटल, बाणेर आणि ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. परंतु 23 सप्टेंबरनंतर नवीन रुग्ण दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्‍त राव यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 percent of corona patients are from outside Pune city

Tags
टॉपिकस