पुणे जिल्हा बँकेकडून 286 कोटींचे पीककर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

रब्बी हंगामातील पिकांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यंदा 286 कोटी 1 लाख 40 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

पुणे - रब्बी हंगामातील पिकांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यंदा 286 कोटी 1 लाख 40 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील 47 हजार 114 शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. 3) सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील रब्बी कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 46.49 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 49 कोटी 71 लाख 77 हजार रुपयांचे वाटप इंदापूर तालुक्यात झाले आहे. 

तालुकानिहाय वाटप (रुपयांत) 
आंबेगाव - 48 कोटी 60 लाख 50 हजार, 
बारामती - 14 कोटी 11 लाख 44 हजार, 
भोर - 6 कोटी 17 लाख 28 हजार, 
दौंड - 17 कोटी 30 लाख 93 हजार, 
हवेली - 5 कोटी 55 लाख 29 हजार, 
इंदापूर - 49 कोटी 71 लाख 77 हजार, 
जुन्नर - 41 कोटी 74 लाख 6 हजार, 
खेड - 49 कोटी 8 लाख 26 हजार, 
मावळ - 13 कोटी 49 लाख 81 हजार, 
मुळशी - 9 कोटी 30 लाख 53 हजार, 
पुरंदर - 9 कोटी 4 लाख 71 हजार, 
शिरुर - 20 कोटी 10 लाख 11 हजार 
वेल्हे - 1 कोटी 76 लाख 71 हजार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 286 crore crop loans from the bank allocated Pune District