पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी २९ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद परिसरातील २६ सराईतांना तडीपार करण्याचे आदेश दिले. तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडांना तडीपार करण्याचा आदेश दिला.