पुणे : वारजे माळवाडीतील 32 पैकी 29 जणांचा कोरोना रिपोर्ट...  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona nigative

तीन जणांचे अहवाल येणे बाकी

पुणे : वारजे माळवाडीतील 32 पैकी 29 जणांचा कोरोना रिपोर्ट... 

वारजे माळवाडी : येथील एका 25 वर्षीय तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या संपर्कातील 32 जणांपैकी 29 जणांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्यामुळे वारजे माळवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अन्य तीन जणांचे अहवाल येणे बाकी आहे. 

आणखी वाचा- पुण्यातील `हा` भाग झाला कोरोनामुक्त !

याबाबत, क्षत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वारजे माळवाडी परिसरातील एकाला कोरोनाची लक्षण आढळली होती. त्यामुळे त्याला गुरुवारी एरंडवणा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याची कोरोनाची तपासणी केली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

शुक्रवारी एक मे रोजी संध्याकाळी त्याचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे, शनिवारी त्याच्या घरातील आणि परिसरातील असे एकूण 32 जणांच्या घशातील द्रव (स्वॅब) तपासणी घेतले होते. त्यातील 29 जणांचा अहवाल रविवारी आले. त्यामध्ये, त्यांची चाचणी नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह आल्यामुळे वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.' 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सहायक आयुक्त संतोष वारुळे, क्षत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा दराडे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांनी तातडीने अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्या. 

रुग्ण राहत असलेला तीन किलोमीटरचा बफर झोन जाहीर केला आहे. एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला. या एक किलोमीटर परिसरातील नागरिकांचा 14 दिवस सातत्याने आरोग्याचा सर्व्हे केला जात आहे. यामध्ये, ज्येष्ठ नागरिक व रक्तदाब, मधुमेह आणि अन्य आजाराने आजारी असलेल्या नागरिकांची माहिती दररोज घेतली जात आहे, असे ही डॉ. तरडे यांनी सांगितले. 

 

loading image
go to top