पुणे : समाजमंदिर सिल केल्याने ३० अंगणवाड्या बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

महापालिकेच्या निधीतून झोपडपट्टीतील नागरिकांसाठी समाजमंदिरे बांधण्यात आली आहेत. पण या समाजमंदिर वर्षानुवर्षे स्थानिक पुढाऱ्यांच्या हातात आहे.

पुणे : समाजमंदिर सिल केल्याने ३० अंगणवाड्या बंद

पुणे - राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यातील समाजमंदिरे महापालिकेने सील केल्याचा फटका झोपडपट्टीतील सुमारे ३० अंगणवाड्यांना बसला असून, त्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले. पण ही अडचण समोर आल्यानंतर या अंगणवाड्या पुन्हा सुरू केल्या जातील असे महापालिकेने एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.

महापालिकेच्या निधीतून झोपडपट्टीतील नागरिकांसाठी समाजमंदिरे बांधण्यात आली आहेत. पण या समाजमंदिर वर्षानुवर्षे स्थानिक पुढाऱ्यांच्या हातात आहे. त्यातून ते उत्पन्न मिळवत असले तरी त्यातून महापालिकेचा काहीच फायदा होत नाही. उलट पाणी, वीज, देखभाल दुरुस्ती याचा खर्च करावा लागत आहे. महापालिकेने १३१ समाजमंदिरे पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यामध्ये १३१ समाजमंदिरांपैकी ९८ जागा या पुढाऱ्यांच्या मंडळांच्या ताब्यात आहेत, त्यांना नोटीस देऊन ५८ समाज मंदिर सील केले आहेत. यापैकी सुमारे ३० ठिकाणी अंगणवाडी भरत असल्याचे समोर आहे. यासाठी मंडळांकडून भाडे ही घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महापालिकेने समाज मंदिर बंद केल्याने एकात्मिक बाल विकास विभागाने महापालिकेशी संपर्क साधला. काही माजी नगरसेवकांनीही याबाबत तक्रार करून झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले आहे हे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आता ही समाज मंदिरे थेट एकात्मिक बाल विकास विभागाला देण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.

अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, ‘‘महापालिकेने समाज मंदिरे सील केले असता त्यातील काही ठिकाणी अंगणवाडी, बालवाडी बंद झाली असल्याची तक्रार आली. यासंदर्भात एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेला पत्र देण्यास सांगितले आहे. त्यांचे पत्र आल्यानंतर त्यांना समाजमंदिर दिले जाईल. ही समाज मंदिर मंडळांच्या ताब्यात असल्याने तेथे बालवाडी भरत असल्याची आम्हाला कल्पना नव्हती.

Web Title: 30 Anganwadi Closed In Pune Due To Sealing Of Samaj Mandir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneAnganwadi
go to top