पिंपरी चिंचवड शहरातील 30 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त

दीपेश सुराणा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये नऊ हजार 757 किलो वजनाचे 29 लाख 90 हजार 767 रुपये किमतीचे खाद्यपदार्थ जप्त केले. एका बेसन मिल विक्रेत्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी गुरुवारी "सकाळ'ला दिली.

शहरात 412 हॉटेल्स आणि 122 स्वीट मार्टची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे नियमित तपासणी केली जाते. अन्नपदार्थांत होणाऱ्या भेसळीच्या अनुषंगाने 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे तपासणी केली. त्यात 81 नमुने तपासण्यात आले. त्यातील 48 नमुने प्रमाणित, 7 नमुने अप्रमाणित, 1 नमुना असुरक्षित असल्याचा निदर्शनास आला. 25 नमुन्यांबाबत प्रयोगशाळेचा अहवाल येणे प्रलंबित आहे.

दीड लाखाचा दंड वसूल
शहरात काही हॉटेल व्यावसायिक आणि स्वीट मार्ट विक्रेते अन्नपदार्थांचा दर्जा व आवश्‍यक स्वच्छता ठेवत नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा करण्यासाठी 118 हॉटेल्सला, तर 11 स्वीट मार्टला नोटिसा बजावल्या आहेत. आठ हॉटेलचालकांकडून तडजोड शुल्कापोटी 57 हजार रुपये तर 9 स्वीट मार्ट विक्रेत्यांकडून तडजोड शुल्कापोटी 91 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे 1 एप्रिल ते 29 नोव्हेंबर या कालावधीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू याबाबत 25 ठिकाणी कारवाई केली. तर 9 वाहने जप्त केली. या कारवाईत 93 लाख 67 हजार 613 रुपये किमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी 9 गुन्हे दाखल केले आहेत.
- सुरेश देशमुख, सह-आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Web Title: 30 Lakh Rupees Food Seized Crime