ST Bus Accident : एसटी बसच्या धडकेत ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला.
Accident

Accident

sakal

Updated on: 

लोणी काळभोर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल कंपनीजवळ घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...