esakal | महत्वाची बातमी : बारामतीत 31 पूल उभारणार?; काय आहे योजना घ्या जाणून
sakal

बोलून बातमी शोधा

महत्वाची बातमी : बारामतीत 31 पूल उभारणार?; काय आहे योजना घ्या जाणून

सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील 31 पुलांबाबत सर्वेक्षण करुन राज्य शासनास अहवाल दिला असून लवकरच शासनामार्फत नाबार्डकडे या पुलांच्या उभारणीसाठी कर्जसहाय्याची मागणी केली जाणार आहे.

महत्वाची बातमी : बारामतीत 31 पूल उभारणार?; काय आहे योजना घ्या जाणून

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटतो, जनजीवन विस्कळीत होते. ही बाब लक्षात घेऊन सातत्याने पावसाळ्यात अडचणीच्या ठरणा-या पूलांची नवनिर्मिती तसेच नूतनीकरण करण्यासाठी नाबार्डला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील 31 पुलांबाबत सर्वेक्षण करुन राज्य शासनास अहवाल दिला असून लवकरच शासनामार्फत नाबार्डकडे या पुलांच्या उभारणीसाठी कर्जसहाय्याची मागणी केली जाणार आहे. यामध्ये खालील ठिकाणच्या पूलांच्या व रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. 

पावसाने ओढ्यांचे अस्तित्व जाणवले...
यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे नाल्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. जवळपास प्रत्येक ओढा नोला या पावसाळ्यात भरुन वाहिल्याने अनेक ठिकाणी येथे ओढा आहे, हे लक्षात आले. त्या मुळे पुलांच्या कामांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. 

•    आंबी बुद्रुक ते आंबी खुर्द क-हा नदीवरील पूल
•    जळगाव सुपे ते जळगाव कडेपठार जोडणारा क-हा नदीवरील पूल
•    वाकी व चोपडज गावानजिकचा ओढ्यावरील पूल
•    पणदरे व करंजेपूलचा नीरा डावा कालव्यावरील पूल
•    मुढाळेनजिक लोणी रस्त्यावरील ओढ्यावरील पूल
•    कुतवळवाडी व पारवडी येथे ओढ्यावरील पूल
•    शिर्सुफळ मंदीरानजिक ओढ्यावरील पूल
•    निंबोडी ते शेटफळगडे सुतारवस्तीजवळील पूल
•    चोपडज येथील पर्णकुटी शाळेजवळील पूल
•     मेखळी बरकडवाडी ते झारगडवाडी रस्ता क-हा नदीवरील पूल
•     खताळपट्टा झारगडवाडी येथे माणिक मासाळवस्ती ओढ्यावरील पूल
•     काटेवाडी येथील नीरा डावा कालव्यावरील धडी पूल
•     मळशीजवळ नीरा डावा कालव्यावरील लोखंडी पूल काढून नवीन पूल उभारणी
•     मुर्टी वाकी होळ रस्त्यावर भगतवाडी व कारंडेमळा येथे पूल
•     खंडोबाची वाडी येथे नीरा डावा कालव्यावर पूल
•     काटेवाडी कण्हेरी रस्त्यावर नीरा डावा कालव्यावर पूल
•     ढेकळवाडी सोनगाव येथे सूळवस्तीजवळ ओढ्यावरील पूल
•     हिंगणीगाडा रस्त्यावर उत्तर खोपवाडी येथील पूल
•     सोनवडी सुपे स्मशानभूमीजवळ पूल
•     अंजनगाव येथे पावसेवस्ती जवळ पूल

•    रस्ते
•    परिटवस्ती ते शिर्सुफळ रस्ता
•    ढाकाळे ते मेडद रस्ता
•    मुर्टी वाकी चोपडज होळ रस्ता
•    रुई सावळ ते निरगुडे रस्ता
•    सोमेश्वर कारखाना, वाणेवाडी मुरुम रस्ता
•    का-हाटीजवळ रस्ता व पूल