पुण्यात ३१० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

लिंडे, टायो निप्पॉन कंपन्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत
Oxygen
OxygenCanva

पुणे : जिल्ह्यातील टायो(Taiyo) निप्पॅान (Nippon) आणि तळोजा(Taloja) येथील लिंडे(Linde) या कंपन्यांकडून बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे पुण्यावर ओढवलेले ऑक्सिजनचे संकट दूर झाले आहे. या कंपन्यांकडून जिल्ह्यातील रुग्णालयांना सर्वाधिक ऑक्सिजनचा(Oxygen) पुरवठा करण्यात येतो. (310 metric tons of oxygen available in Pune as Supply from the Linde companies are undo)

Oxygen
लस खरेदीसाठी पुणे घेणार मुंबई महापालिकेची मदत

सध्या कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रुग्णालयांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत आहे. पुणे जिल्ह्यासाठी दररोज सुमारे ३१० ते ३२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. पुणे जिल्ह्यासाठी लिंडे कंपनीच्या तळोजा आणि मुरबाड येथील कंपनीतून १२० मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होतो. तर, टायो निप्पॅान कंपनीकडून दररोज सुमारे ३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. परंतु, सोमवारी टायो निप्पॅान आणि तळोजा येथील लिंडे या कंपन्यांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती बंद झाली होती. परिणामी पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करून फ्रान्स सरकारने दिलेल्या ऑक्सिजनपैकी ३० मेट्रिक टन आणि रायगडमधून ऑक्सिजन तातडीने उपलब्ध केला. तसेच, ओडिशा येथून रेल्वेद्वारे ५८ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. त्यामुळे पुण्यावरील ऑक्सिजन तुटवड्याचे संकट तूर्तास टळले होते.

पुणे जिल्ह्यासाठी बुधवारी ऑक्सिजनचा झालेला पुरवठा (कंपनी आणि उपलब्ध ऑक्सिजन मेट्रिक टनमध्ये) :

  • लिंडे १५०

  • टायो निप्पॅान २५

  • आरआयएल १५

  • एअर लिक्विड ४०

  • आयनॉक्स ८०

''पुणे जिल्ह्यासाठी लिंडे आणि टायो निप्पॅान या दोन्ही कंपन्यांकडून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. या दोन कंपन्यांसह इतर प्रकल्पांमधून बुधवारी ३१० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला. त्यामुळे अचानक उद्भवलेले ऑक्सिजनचे संकट टळले आहे.''

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

Oxygen
बारामतीत कोरोना हळुहळू नियंत्रणात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com