
पुणे : तो अभियंता, तर ती डॉक्टर. गिर्यारोहणाच्या छंदातून दोघे एकत्र आले. पुढे प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, पण प्रश्न त्यापुढे होता. प्रारंभी लग्नाला काहीसा विरोध करणाऱ्या कुटुंबीयांचा मुलांच्या प्रेमापुढे विरोध मावळला आणि लग्नाचा मुहूर्त ठरला १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’चा.