

३५ वर्षांचा संघर्ष फळाला; वारसदार संस्थेला ३० कोटींची जागा
धरमशी लाईन येथील जागा संस्थेच्या नावे हस्तांतरित; प्रतीक्षेला पूर्णविराम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : तीन दशकांहून अधिक काळ न्यायासाठी सुरू असलेल्या जुनी मिल कामगार वारसदारांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. शहरातील मध्यवर्ती धरमशी लाईन येथील सुमारे २५ ते ३० कोटी रुपये मूल्याची जागा जुनी मिल बेकार कामगार वारसदार कल्याणकारी संस्थेच्या नावे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला पूर्णविराम मिळाला असून, वारसदारांच्या दीर्घ प्रतीक्षेचा शेवट झाला आहे.
सन १९६३ मध्ये जुनी मिल बंद झाल्यानंतर ९ ऑगस्ट १९८८ रोजी जनहित संघर्ष समितीची स्थापना करून न्यायालयीन तसेच लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात आला. या प्रक्रियेत अनेक टप्पे पार करत नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्लॉट मिळाले. त्याच अनुषंगाने २५ जुलै २०२६ रोजी धरमशी लाईन येथील सुमारे २५ ते ३० कोटी रुपये मूल्याची जागा संस्थेच्या नावे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्ष विद्या माने व सचिव मधुकर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२४ रोजी कुमार करजगी यांनी जागा देण्याबाबत लेखी सहमती दर्शविली होती. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागेचे हस्तांतरण झाले.
प्लॉटसाठी नागरिकांकडून कोणतीही रोख रक्कम घेतली नसल्याचा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच विविध अडथळे निर्माण झाले तरी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून अखेर संस्थेला जागेचा ताबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिद्राम ढोबळे, रजनीकांत इंगळे, पल्लवी सुरवसे, अमोल रणशृंगारे, अजय मस्के आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.