नारायणगावात साडेतीन हजार किलो मांस जप्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

बंदी असताना प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररीत्या वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी येथील पुणे-नाशिक महामार्गावर दोन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन हजार पाचशे किलोग्रॅम मांस व आयशर कंपनीचा टेम्पो असा ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी दिली.

नारायणगाव - बंदी असताना प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररीत्या वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी येथील पुणे-नाशिक महामार्गावर दोन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन हजार पाचशे किलोग्रॅम मांस व आयशर कंपनीचा टेम्पो असा ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी दिली. 

या प्रकरणी टेम्पो चालक सुफियान शब्बीर अंसारी (वय ३३, रा. शिळफाटा मुंब्रा, जि. ठाणे), अशफाक महम्मद हनीफ आतार (वय ४०, रा. मंगळवार पेठ, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गुंड म्हणाले, ‘‘आरोपी पुणे नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून मांस घेऊन निघाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी (ता. ५) पहाटे साडे तीनच्या सुमारास नारायणगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पुणे- नाशिक महामार्गावर वारूळवाडी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर टेम्पो (एमएच १४, एचजी २४०९) ताब्यात घेतला. तपासणी केली असता टेम्पोत तीन हजार पाचशे किलोग्रॅम मांस आढळून आले. 

पुणे-औरंगाबाद एसटीवर झळकले संभाजीनगरचे फलक; मनसेचे कार्यकर्ते आक्रमक

पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे मांस गाई व बैलांचे असल्याचे निष्पन्न झाले. पशुसंवर्धन विभागाची परवानगी नसताना गोवंश कापणे, वाहतूक करणे या साठी बंदी असताना गाई व बैलांची बेकायदेशीररीत्या कत्तल करून मांस वाहतूक केल्याप्रकरणी पशू परीक्षण अधिनियम १९४८ चे कलम ५ (क), महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९ (अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अंसारी व आतार यांना 
अटक केली.’’

पुण्यात वृद्ध दाम्पत्याची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3500 kg meat seized in Narayangaon crime