Narayangaon Crime : शेतीच्या कामासाठी जळगाव व नाशिक जिल्ह्यातील 36 शेतमजुरांना ठेवले डांबून; मुकादमावर गुन्हा दाखल

आठ कुटुंबातील 36 शेतमजुरांना दोन वर्ष बंधनात ठेवून, मारहाण करून धमकावून त्यांच्या इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊस तोड व इतर काम करून घेतली.
Crime

Crime

sakal

Updated on

नारायणगाव - जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आठ कुटुंबातील 36 शेतमजुरांना दोन वर्ष बंधनात ठेवून, मारहाण करून धमकावून त्यांच्या इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊस तोड व इतर काम करून घेतल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वळती तालुका आंबेगाव येथील मुकादम खंडू भानुदास माने (वय 36) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com