पुणे : हिंदु राष्ट्र सेनेच्या जिल्हा संघटकासह 37 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कोथरुड येथील गांधी भवनामध्ये गुरूवारी सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित नागरीकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) जनआंदोलन करण्यात आले होते. तेथे घोषणा देऊन गोंधळ घालणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या जिल्हा संघटकासह 37 जणांना कोथरुड पोलिसांनी अटक केली.

पुणे : कोथरुड येथील गांधी भवनामध्ये गुरूवारी सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित नागरीकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) जनआंदोलन करण्यात आले होते. तेथे घोषणा देऊन गोंधळ घालणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या जिल्हा संघटकासह 37 जणांना कोथरुड पोलिसांनी अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हा संघटक संतोष उर्फ अण्णासाहेब किसन देवकर (वय 30, रा.फुरसुंगी) यांच्यासह 37 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर याने तीस ते चाळीस साथीदारांसह पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गांधी भवन येथील सार्वजनीक रस्त्यावर बेकायदेशीरपणे जमाव एकत्र केला. तेथे "वुई सपोर्ट सीएए, एनआरसी', "जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा दिल्या.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

सहपोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन तसेच सार्वजनीक शांततेचा भंग केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही पाटील करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 arrested along with Hindu Rashtra Sena in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: