
Science Festival : जुन्नरला विज्ञान महोत्सवात २४ शाळेतील ३७३ विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध स्पर्धांचे आयोजन
जुन्नर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शनिवार ता.०७ रोजी तालुका पातळीवरील विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले होते.
विज्ञान महोत्सवात २४ शाळा-महाविद्यालयातील ३७३ विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकल्प सादर केले होते. विविध स्पर्धेत सहभाग विद्यार्थी पुढील प्रमाणे :- प्रकल्य गणितीय प्रतीकृती - ६१,भित्तीपत्रक स्पर्धा - ८०,
रांगोळी स्पर्धा -४२, वक्तृत्व स्पर्धा - ३८,संगणकीय सादरीकरण स्पर्धा - ४० अशा एकूण २६१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. दिवसभरात सुमारे एक हजार ५०० विद्यार्थी व पालकांनी महोत्सवास भेट दिली.
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय काळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी निवृत्ती काळे होते. यावेळी विश्वस्त ॲड.अविनाश थोरवे, सुभाष कवाडे, प्रभारी प्राचार्य डॉ.डी. व्ही. उजगरे,
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी, प्रबंधक एम. डी. कोरे तसेच विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते . प्रास्ताविक प्राचार्य डी.व्ही.उजगरे यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. एच. सावंत यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. एम बी वाघमारे यांनी मानले.
विज्ञान महोत्सवामध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले होते त्यातील पहिल्या तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढील प्रमाणे
पोस्टर प्रेझेटेशन :- संतोषी ताम्हाणे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर. सई वाजगे, सबनीस विद्यामंदिर नारायणगाव. अरमान पठाण, ब्लूमिंगडेल स्कूल नारायणगाव.
रांगोळी स्पर्धा :- नेहा वाजगे व सृष्टी डोंगरे, सबनीस विद्यालय, नारायणगाव. सिद्धी माताडे ब्लूमिंगडेल स्कूल नारायणगाव.
पावर पॉइंट प्रेझेंटेशन:-आशिमा पादिर, अनंतराव कुलकर्णी विद्यालय नारायणगाव. सई तांबे, चैतन्य विद्यालय ओतूर.वेद गुंजाळ, ब्लूमिंगडेल स्कूल नारायणगाव.
वक्तृत्व स्पर्धा :- श्रद्धा ताजणे, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर. श्रावणी घुले, कुलस्वामिनी विद्यालय वडज. दिशा मोरे श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
प्रकल्प व गणितीय प्रतिकृती:- समर्थ शेळके, समर्थ गुरुकुल बेल्हे.अंजली नांगरे व सुवर्णा घुटे, शासकीय आश्रम शाळा,अंजनावळे. अभिनंदन लोहोकरे, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली. धनश्री उकिर्डे,तन्वी उकिर्डे,समृद्धी लोहटे,श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
" ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आपल्या बुद्धी व कौशल्याद्वारे नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्या अंगी संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे. आपल्या देशाला महान शास्त्रज्ञ व संशोधकांचा वारसा असून तो पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीची आहे."
- ॲड. संजय काळे, अध्यक्ष जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर, (पुणे).