पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली ३४ गावे ठरविणार ३९ नगरसेवक

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावामधून केवळ चार नगरसेवक वाढणार असे सांगितले जात होते.
Pune Municipal corporation
Pune Municipal corporationSakal
Summary

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावामधून केवळ चार नगरसेवक वाढणार असे सांगितले जात होते.

पुणे - पुणे महापालिकेत (Pune Municipal) नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावामधून (Village) केवळ चार नगरसेवक (Corporator) वाढणार असे सांगितले जात होते. मात्र, प्रभाग रचनेत (Ward Structure) उपनगरांमधील प्रभागांची संख्या वाढताना समाविष्ट गावांचा त्यात समावेश केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किमान १३ प्रभागांमधील ३९ नगरसेवक हे समाविष्ट गावातील मतदार ठरवणार आहेत.

पुणे महापालिकेने १७३ नगरसेवकांना निवडून देण्यासाठी ५८ प्रभागांचा प्रारूप आराखडा सादर केला. यामध्ये मोठ्याप्रमाणात तोडफोड केल्याने प्रभाग समजून घेताना इच्छुकांना घाम फुटल्याची स्थिती आहे. महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली. तेथील १.५० लाख लोकसंख्येच्या आधारावर दोन नगरसेवकांचा समावेश महापालिकेत झाला. तर जून २०२१ मध्ये २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली असता तेथील लोकसंख्या १. ९० लाख असल्याने आणखी दोन नगरसेवकांची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाली. राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी निर्णय घेतल्याने पुण्यातील नगरसेवक संख्या १६४ वरून १७३ इतकी झाली.

Pune Municipal corporation
पुणे : अनुकूल प्रभाग दिसताच राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा

समाविष्ट ३४ गावातून ४ नगरसेवक वाढतील असे सांगितले जात होते. पण आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत लोहगाव-विमाननगर, वाघोली इआॅन पार्क, बाणेर सुस म्हाळुंगे , मांजरी शेवाळवाडी, साडेसतरानळी-आकाशवाणी, हडपसर- सातववाडी, वारजे कोंढवे धावडे, रामनगर- उत्तमनगर शिवणे, फुरसुंगी, मोहम्मदवाडी-उरुळी देवाची, नांदेड सिटी सनसिटी, खडकवासला नऱ्हे, धायरी आंबेगाव गावांचा समावेश आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने १३ प्रभागातून ३९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट गावांचा समावेश असलेल्या प्रभागांवर जोर द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com