3rd Phase Lok Sabha Voting : बारामती शहरात सहानंतरही मतदान

अनेक मतदान केंद्रांवर मतदार शेवटच्या क्षणी आल्याने मतदान सहानंतरही सुरू राहिले.
3rd Phase Lok Sabha Voting 2024 baramati even after 6 voting record last minute claim right to vote
3rd Phase Lok Sabha Voting 2024 baramati even after 6 voting record last minute claim right to voteSakal

Baramati News : बारामती शहरात दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा टक्का कमी होता, नंतर मात्र मतदानाचा वेग वाढला, दुपारी चार नंतर सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी झाली व मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर मतदार शेवटच्या क्षणी आल्याने मतदान सहानंतरही सुरू राहिले.

दिवसभरात छोट्या मोठ्या अनेक तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बारामतीत सकाळपासूनच विविध वयोगटातील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी होता, मात्र नंतर तो वाढत गेला.

अनेक कुटुंबांनी एकत्रित येत मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा कडाका प्रचंड असल्याने ऊन तापण्यापूर्वी मतदान उरकून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती.

अकरानंतर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. वयोवृद्ध नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावताना प्राधान्य दिले गेले. अनेक ठिकाणी रांगांमध्ये उभे राहावे लागले तरी एकही मतदार मतदान न करता परत गेला नाही, हेही एक वेगळेपण होते.

शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. अनेक मतदान केंद्रांबाहेरील बूथवर कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. पूर्वी एकाच गटात असलेले कार्यकर्ते विभागले गेल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असल्याने त्याचा चांगला फायदा झाला.

मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी

काटेवाडी : बारामती येथे मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या काटेवाडी येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या. त्याची चर्चा झाली. याबाबत सुळे यांनी सांगितले की, ‘‘मी माझ्या काका- काकांच्या घरी गेले होते.

ते माझेच घर आहे. सुमतीकाकी व आशाकाकी आज मतदानासाठी या ठिकाणी आल्या. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आले. आमच्या सगळ्या काक्या आमच्या आईच आहेत. राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला आणि सुप्रिया सुळे नेहमी नाती सांभाळते.’

’ या भेटीबाबत अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या आलेल्या मला माहीत नाही. असे कोणी भेटून गेले म्हणून त्यावर बारामतीचा मतदार मतदान करत नाही. ते फार विचारांती मतदान करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com