पुणे जिल्ह्यात पावणेचार लाख मतदार छायाचित्राविना

याद्यांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार मतदारांची संख्या लक्षणीय
voters photo issue konkan sindhudurg
voters photo issue konkan sindhudurg

पुणे : शहरी मतदार उदासीन आहे...मतदानासाठी ते घराबाहेरच पडत नाहीत...अशी कारणे सांगितली जातात. परंतु मतदार याद्यांमध्ये स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल पावणेचार लाख मतदारांचे छायाचित्र नसून, त्यात बहुतांश स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत शहरी मतदानाचा टक्का हा कमी दिसत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४ इतकी आहे. त्यापैकी तीन लाख ७९ हजार ९३३ मतदारांचे छायाचित्र नाही. त्यामध्ये पुणे शहरातील आठ मतदारसंघातील मतदारांची संख्या सर्वाधिक तीन लाख १५ हजार ३५९ असून, ग्रामीणच्या तुलनेत जास्त आहे. जुन्या मतदारयादीतील मृत मतदारांच्या कुटुंबीयांनी मृत्यूचा दाखला देऊन यादीतून नाव कमी केलेले नाही. काही मतदारांनी दोन-दोन ठिकाणी नावे नोंदवली आहेत. दुबार नावे असलेल्या मतदारांनी स्वतःहून सात क्रमांकाचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

voters photo issue konkan sindhudurg
माझा काय संबंध?, बदनाम का करतात?; अजित पवार यांचा सवाल

छायाचित्र नसलेल्यांची वेगळी यादी

निवडणूक विभागाकडून २००८ पासून छायाचित्रासह मतदार नोंदणी केली जाते. त्यामुळे नवीन मतदारांची नावे छायाचित्रांसह आहेत. जुन्या यादीतील रंगीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी मतदान केंद्रनिहाय ठेवण्यात येईल. केंद्रावरील अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा रहिवासी पुरावा दाखवणे आवश्यक आहे. अशा मतदारांची खात्री पटल्यानंतरच मतदान करता येणार आहे.

''निवडणूक विभागाकडून निरंतर मोहिमेअंतर्गत मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांनी विधानसभानिहाय मतदार नोंदणी कार्यालयात आधारकार्ड, वीज बिलासह दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जमा करावे. ते जमा न केल्यास मतदारयादीतून नावे वगळण्यात येतील. या मोहिमेमुळे स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची बहुतांश नावे यादीतून कमी होणार आहेत.''

- मृणालिनी सावंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

voters photo issue konkan sindhudurg
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मेट्रो प्रकल्पाचा आढावा

अशी आहे स्थिती

पुणे शहरातील मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्राविना मतदार

वडगावशेरी ४ लाख ६१ हजार ९७६ ७० हजार ७११

शिवाजीनगर ३ लाख ६ हजार ४२० ३० हजार ४७४

कोथरूड ४ लाख १३ हजार ३८९ ४६ हजार ८८९

खडकवासला ४ लाख ९५ हजार ९५७ ४७ हजार ७८९

पर्वती ३ लाख ५४ हजार ४७१ २३ हजार ५८०

हडपसर ५ लाख १९ हजार ७१७ ५० हजार २२२

पुणे कॅन्टोन्मेंट २ लाख ९२ हजार ९०९ २९ हजार ७८५

कसबा पेठ २ लाख ९३ हजार २२४ १५ हजार ९०९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com