चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेले ४ विध्यार्थी बुडाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

4 students drowned swimming Chas dam pune

चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेले ४ विध्यार्थी बुडाले

चास : गुंडाळवाडी (ता. खेड) येथे चास कमान धरणाच्या जलाशयात सह्याद्री स्कूल चे पोहायला गेलेले ४ विद्यार्थी बुडून मरण पावल्याची घटना घडली असून या बाबत खेड पोलीस पुढील तपास करत आहेत. गुंडाळवाडी येथील तिवई हिल येथे सह्याद्री स्कूल हे इंटरनॅशनल स्कूल असून येथे निवासी विध्यार्थी आहेत. उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विध्यार्थी पोहण्यासाठी वा पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले होते.

शिक्षकांच्या म्हणण्या नुसार कांही विद्यार्थी कमरे एवढ्या पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आल्याने या लाटेत ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या वेळी शिक्षकांनी तातडीने पोरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत काही विद्यार्थी तीरावर आणले मात्र त्यातील ४ विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. या मध्ये परीक्षित अग्रवाल, रितीन डीडी हि २ मुले तर तनिशा देसाई व नव्व्या भोसले या २ विध्यार्थिनी बुडन मयत झाल्या आहेत. या घटनेची माहित कळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या घेत विध्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व रात्री उशिरा पर्यत सर्व चारही मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले. याबाबत खेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यासह त्यांचे सहकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.