40 Year Old Government Building Lying Neglected for 25 Years
sakal
मंचर - मंचर शहरातील जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारलेली ८०० ते १ हजार चौरस फुटांची पक्की इमारत गेल्या २५ वर्षांपासून वापराविना बंद आहे. विशेष म्हणजे, शहरातील अनेक शासकीय कार्यालये खासगी इमारतींमध्ये भाड्याने सुरू असताना मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही शासकीय इमारत मात्र दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे.