Jaggery Processing Units close
sakal
खुटबाव - अन्न व औषध प्रशासनाच्या छापेमारीमुळे भेसळ असलेला गूळ तयार करणारे परप्रांतीय गुऱ्हाळचालक धास्तावले आहेत. शेतकऱ्यांना दिलेला ऊस दर व तयार झालेल्या गुळाचा दर याचे गणित जुळत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून दौंड तालुक्यातील ४०० गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय परप्रांतीय गुऱ्हाळचालकांनी घेतला आहे. त्यामुळे सर्व गुऱ्हाळघरांवर ऊस गाळपाअभावी वाळत पडला आहे.