Kundmala Bridge Collapse : कुंडमळा साकव दुर्घटनेतील २४ जण घरी, काहींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Kundmala Accident Update : कुंडमळा लोखंडी साकव दुर्घटनेतील ४१ जखमींपैकी २४ जणांना सुटी देण्यात आली असून काहींवर अद्याप ICU व जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे : इंदायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी साकव कोसळल्याची दुर्घटना रविवारी घडली होती. त्यातील जखमींवर तळेगाव दाभाडे आणि सोमाटणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४१ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २४ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.