pune road potholes
sakal
पुणे - शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना सत्ताधाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून अजूनही खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली नाही. खड्डे बुजविण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांनी एकाही ठेकेदाराला कार्यादेश दिलेले नाहीत. त्यामुळे ४१ निविदा अडकून पडल्या आहेत.