पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 4134 नवे कोरोनारुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पिंपरी चिंचवडमधील 13 , जिल्हा परिषद क्षेत्रातील 21, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एक रुग्ण आहे. दरम्यान, काल दिवसभरात 3 हजार 766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे - पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.13) दिवसभरात 4 हजार 134 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख 24 हजार 826 झाली आहे. काल 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

काल दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 978, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 28, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 788, नगरपालिका क्षेत्रातील 221 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 109 रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 44 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 13 , जिल्हा परिषद क्षेत्रातील 21, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एक रुग्ण आहे. दरम्यान, काल दिवसभरात 3 हजार 766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये पुणे शहरातील 1 हजार 587, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 682, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 365, नगरपालिका क्षेत्रातील 96 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 36 जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 78 हजार 393 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 5 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 178 जण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4134 new corona patients in Pune district on Sunday