पुणे जिल्ह्यात शुक्रवारी दिवसात ४ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण; १५ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दहा, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे.
Corona Patients
Corona PatientsSakal media
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यातील दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दहा, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) शुक्रवारी (ता.४) दिवसात ४ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट ७ हजार १६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १५ जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक १८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल (गुरुवारी) झाली होती. शुक्रवारी मृत्यूची संख्या ३ ने कमी झाली आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दहा, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे. दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारी अहवालातून हे उघडकीस आले आहे.

Corona Patients
धीरज,आम्हाला नाही तुझी गरज; घाटेंच्या पोस्टरबाजीला जशास तसे उत्तर

शुक्रवारी दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ११० रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १८०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६७३, नगरपालिका हद्दीत १३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ३७४ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार २५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २०४, नगरपालिका हद्दीतील २२८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९८ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com