
पुणे : ‘‘राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खासगीकरणासाठी खुल्या करण्यात येत आहेत. खरंतर, हे खासगीकरण नव्हे तर एकत्रीकरण असेल. यात शासकीय आयटीआयवरील सरकारची मालकी कायम राहील. फक्त आयटीआयचा विकास आणि क्षमता वाढविण्यासाठी मोठ-मोठ्या उद्योग समूहांसह स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाईल. यापूर्वीही अशाप्रकारे सहकार्य घेण्यात आले होते, परंतु आता मोहीम म्हणून हे हाती घेतले जाईल,’’ अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.