बारामतीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट्स... 

संतोष आटोळे
Thursday, 7 May 2020

- 8 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील कटफळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तसेच इतर संशयित अशा एकूण 52 व्यक्तींचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 8 जणांचे अहवाल दुपारपर्यंत येतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वांचे अहवाल आले तर शहरातील दवाखान्याची संबंधित अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे. तर उर्वरितांच्या अहवालाकडे नजरा लागल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कटफळ गावातन मुंबई येथे रविवार (ता.03) रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या 79 वर्षीय ज्येष्ठाचा सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तसेच इतर लक्षणे जाणवणाऱ्या ग्रामीण भागातील 44 व बारामती शहरातील ज्या हॉस्पिटलमध्ये त्याने उपकार घेतले तेथील 8 अशा एकूण 52 लोकांचे नमुने मंगळवार व बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील 44 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर संबंधितांवर उपचार करणाऱ्या बारामती येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व इतरांचे कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, ग्रामीण भागातील रिपोर्ट निगेटिव्ह आले असला तरी सुरु असलेले सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिर्सुफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी दिली आहे. 

ग्रामीण भागाला दिलासा

कटफळ प्रकरणापासून तालुक्याचा ग्रामीण प्रचंड भिती पसरली होती. मात्र, आता अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी ग्रामस्थांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 44 Peoples of Baramati Corona Test Negative