Corona Updates: जिल्हा परिषद आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात एकही मृत्यू नाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

शुक्रवारी दिवसभरात ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३० हजार ५८० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १३ हजार २४४ कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१३) दिवसभरात ४६८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी (ता.१२) ही संख्या ६२२ झाली होती. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २२६ जण आहेत. दिवसभरात ५ हजार २६४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दिवसभरात ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३० हजार ५८० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १३ हजार २४४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत ८ हजार १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३७७ रुग्ण आहेत.

'पत्रास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व'; शरद पवार यांचे आईला भावनिक पत्र​

पिंपरी चिंचवडमध्ये आज ९८, जिल्हा परिषद क्षेत्रात ९५, नगरपालिका
क्षेत्रात ३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील पाच जण आहेत. पिंपरी चिंचवड २ आणि नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही  रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.१२) रात्री ८ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.१३) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 468 new corona patients found in Pune district on Friday 13th Nov 2020