pune city streams
sakal
पुणे - शहरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नाल्यांना पूर येतो, सोसायट्यांमध्ये पाणी घुसते, यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. यावेळी नाले वळविल्यामुळे हे नुकसान होते, असा आरोपही केला जातो. आता महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत शहरातील ४७ नाले हे बिल्डरांच्या अर्जावरून वळविले असल्याची कबुली दिली आहे. मात्र, कोणत्या भागातील किती नाले आहेत, याची माहिती समोर येऊ शकली नाही.