Electric Poll Collapse by Heavy Rain
sakal
निरगुडसर - मंचर-निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव नजीक गव्हाळी मळा येथे पेट्रोल पंपाजवळ ४८ फूट उंचीचा विजेचा लोखंडी खांब आणि त्याला आधार दिलेला असे दोन खांब रविवार (ता. २८) रोजी सायंकाळी रस्त्यावर कोसळले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. १५ दिवसापूर्वीच उभे करण्यात आलेले लोखंडी खांब पहिल्याच पावसात कोसळल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप प्रवासी, नागरिकांनी केला आहे.