esakal | लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ
sakal

बोलून बातमी शोधा

khopoli

या अपघातात अमोल बालाजी चिलमे (29), निवृत्ती उर्फ अर्जून राम गुंडाळे (31), गोविंद नलवाड (35), प्रदीप प्रकाश चोले (31), नारायण राम गुंडाळे (27) यांचा जागीच मृत्यू झाला.

लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात अंडापॉईंट जवळ लघुशंकेसाठी थांबले असता तीन मोटारसायकलींवर आयशर टेम्पो पडून पाच युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व सुट्टी असल्याने अलिबागला फिरायला गेले होते.  अलिबाग वरून पुन्हा तळेगावला परत येताना रविवारी रात्री साडेदहा वाजता हा दुर्दैवी अपघात झाला. 3 मोटारसायकलींवरील 6 प्रवासी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास अलिबागहून पुण्यातील तळेगावकडे जात होते. यावेळी प्रवासात ते बोरघाटातील खोपोली येथे मोटारसायकल बाजुला लावून लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी पुण्याकडून मुंबईकडे जाणार टेम्पो अवघड वळणावर पलटी झाला आणि थेट या प्रवाशांच्या अंगावर आला. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही अंतरावर असलेला बालाजी हरिश्चंद्र भंडारी (35) हा किरकोळ जखमी झाला.

या भयानक अपघाताची माहिती होताच,  या ठिकाणी मदतीसाठी बोरघाट महामार्ग पोलिस व अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, खोपोली अपघातग्रस्त मदतीकरिता स्वयंसेवी संस्थांचे सर्व प्रमुख सदस्य, आयआरबीची देवदूत टीम इत्यादी मदत कार्यात सहभागी होऊन  ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढून तात्काळ खोपोली नगरपालिकाचे दवाखान्यात आणण्यात आलेत. मात्र त्या पूर्वीच यातील पाचही तरुणांचा मृत्यू झालेला होता. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. मदत कार्य पार पडल्यावर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या अपघातात अमोल बालाजी चिलमे (29), निवृत्ती उर्फ अर्जून राम गुंडाळे (31), गोविंद नलवाड (35), प्रदीप प्रकाश चोले (31), नारायण राम गुंडाळे (27) यांचा जागीच मृत्यू झाला.