तळेगाव दाभाडे - मावळ तालुक्यात मागील वर्षभरात विविध ठिकाणी २२ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर जूनच्या मागील आठ दिवसांत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. यात लोणावळ्यात रविवारी घडलेल्या घटनेचाही समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांनी हौसेखातर पाण्यात उतरून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस, जीवरक्षक आणि सामाजिक संघटनांनी केले आहे.