नेटबँकिंग हॅक करून पाच लाख केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

व्यावसायिकाचे नेट बॅंकींग खाते हॅक करुन सायबर गुन्हेगारांनी व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातील तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लष्कर परिसरात घडला असून याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : व्यावसायिकाचे नेट बॅंकींग खाते हॅक करुन सायबर गुन्हेगारांनी व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातील तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लष्कर परिसरात घडला असून याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अविनाश कुलकर्णी (वय 63, रा. सोमवार पेठ) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहे. त्यांचे लष्कर परिसरातील ईस्ट स्ट्रीटवर ट्रेडिंग फर्म आहे. त्यांचे एका बॅंकेमध्ये खाते आहे.

दरम्यान, 12 डिसेंबर 2019 मध्ये फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी सायबर गुन्हेगाराने त्यांचे नेटबॅंकींग खाते हॅक केले. त्याद्वारे तीन वेळा त्यांच्या बॅंक खात्यातुन अनधिकृतपणे व्यवहार करीत खात्यातील पाच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 lakh stoles through net banking at Pune