"पुणे शहराला लवकरच ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार"

महाराष्ट्र शासन टाटा कंपनीला ५ टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात तेवढी वीज उपलब्ध करून देण्याचा करणार प्रयत्न
"पुणे शहराला लवकरच ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार"

बालेवाडी : "मुळशी तालुक्यातील धरण हे टाटा कंपनीचे असून त्यावर या कंपनीच्या वतीने विज निर्मिती केली जाते,परंतु पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही ,आता विविध माध्यमातून विज निर्मिती केली जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासन टाटा कंपनीला ५ टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात तेवढी वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमलेले असून ही कमिटी त्याच्यावर कामकाज करत आहे त्यामुळे पुणे शहराला लवकरात लवकर ५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस राहणार आहे."

बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्र. ९ , डॉ. सागर गणपतराव बालवडकर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते ता.19 रोजी करण्यात आले यावेळी अजित पवार बोलत होते.

तसेच सुस आणि म्हाळुंगे गावासह इतर २३ गावे आता पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाली असून इतर शहराप्रमाणे या नवीन समाविष्ट गावांना सुद्धा सर्व सुख सुविधा मिळावीत याकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोणताही निधी कमी पडू देणार नाही , सन २०१२-१३ साली बाबुराव चांदेरे यांच्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्या कार्यकाळात बाणेर - बालेवाडी या परिसराचा नियोजन बद्ध विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला , त्याचप्रमाणे पीएमआरडीने २३ गावे पुणे महानगरपालिकेमध्ये येण्यापूर्वी म्हाळुंगे गावाचा डीपी प्लॅन तयार केलेला असून यासंदर्भात पीएमआरडीचे आयुक्त व म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ सर्वजण एकत्रित बसून शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात यातून मार्ग काढू असे यावेळी अजितदादा पवार बोलत होते .

"पुणे शहराला लवकरच ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार"
अजितदादा म्हणाले, ‘एवढा पाऊस पडला की..’

जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्त अजितदादा म्हणाले जनसंपर्क कार्यालय हे जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी असतात आणि जनसंपर्क कार्यालयात महिला असणे गरजेचे आहे कारण अनेक महिलांना आपल्या समस्या पुरुषांना सांगणे कठीण वाटते त्यामुळे महिला - महिलेला आपली अडचण बिनधास्तपणे सांगू शकते.त्यादृष्टीने डॉ. सागर बालवडकर जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र महिलांसाठी प्रा. रूपाली सागर बालवडकर ह्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः उपलब्ध असणार आहेत .

यावेळी श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या वतीने बाणेर बालेवाडी, सुस , म्हाळुंगे या भागातील संघर्ष करून जिद्दीने इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना आर्थिक पाठबळ म्हणून या वर्षापासून " अजित आकांक्षा शिष्यवृत्तीचे वितरण " करण्यात आले दरवर्षी ही शिष्यवृत्ती रोख रक्कम ११ हजार रुपयांची देण्यात येणार आहे , त्याचप्रमाणे " सागर सेतू ग्रंथालय आपल्या दारी " याचे उदघाटन देखील अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले . श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेली निवडक आणि लोकप्रिय पुस्तके, मासिके ही ग्रंथप्रेमी , विद्यार्थी व नागरिकांना वाचायला उपलब्ध व्हावीत या हेतूने सागर सेतू या अँपची निर्मिती करण्यात आली आहे , या माध्यमातून त्याचा लाभ सर्व नागरिकांना घेता येईल , आपल्या भागात या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन वाचन संस्कृती उदयास येईल या आशेने या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे .

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत जगताप , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे , श्री . खंडेराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणपतराव बालवडकर , नगरसेवक मयूर कलाटे , प्रा. रूपाली बालवडकर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे ,सुनील चांदेरे , नामदेव चांदेरे , समीर चांदेरे ,सुहास भोते, सुखदेव चांदेरे, पुनम विधाते , विशाल विधाते,मनोज बालवडकर , चंद्रशेखर जगताप ,पोपटराव पाडाळे , युवराज कोळेकर , निलेश पाडाळे , अजिंक्य निकाळजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com