आशा स्वयंसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू; कुटुंबाला ५० लाखांची मदत

aasha workers
aasha workers
Updated on

पुणे : बोडकेवाडी (ता. मुळशी) येथील कोरोनामुळे निधन झालेल्या आशा स्वयंसेविका मंगल बलकवडे यांच्या कुटुंबाला बुधवारी (ता. २) पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्यात आली. ही रक्कम त्यांच्या कुटुंबाच्या खात्यावर जमा केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

aasha workers
खाद्यतेलाचे भाव दोनशे रुपयांनी उतरले; मागणीत घट
aasha karyakrtya.jpg
aasha karyakrtya.jpg

बलकवडे या मुळशी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काम करत होत्या. मार्च २०२० पासून त्या रुग्णांना धीर देणे, हॉस्पिटलला पाठवणे, रुग्णवाहिका आणि बेड मिळवून देणे, घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांचा फॉलोअप घेणे आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करणे आदी कामे करत असत.

ही सर्व कामे करत असतानाच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पण उपचार चालू असतानाच त्यांचा ६ सप्टेंबर २०२० ला मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers
Krushiratna Anil Meher received the Yash Jeevan Gaurav Award 2026 for excellence in agriculture, rural development, and farmer empowerment.
Pune Crime: Ten Booked After Brutal Assault on Woman and Her Family in Khadki
Marathi News Esakal
www.esakal.com